Stitchline All Types Of Nighties

Stitchline All Types Of Nighties Nighty making and customized stitching expert

16/05/2026

नमस्कार..
आजच्या videoत तुम्ही ४ नाईटिज पहाल. ह्या चारही ही नाईटिज बाटिक कापडापासून तयार केल्या आहेत. नाईटिज बनवण्यासाठी ३ मिटर पीस बाजारात मिळतात. एकाच प्रिंट मध्ये सहा, आठ, दहा रंगाचा एक पीस अश्या संचात ते घ्यावे लागतात. (wholesale market).

बाटिक कापड सुती असल्याने मुंबईतील हवामानासाठी आरामदायी ठरतं. हे कापड टिकाऊ असतं. ह्या कापडाचे रंग टिकून रहावे म्हणून हे नाईटिज नेहमी उलट करून ( आतली बाजू बाहेर) सावलीत सुकवावेत.

बाकी.. अधिक माहिती साठी सोबतचा...काही सेकंदाचा video संपूर्ण पहा.

आभार...!!

14/05/2026


#मराठी_उद्योजक
#खाद्यपदार्थ

नमस्कार..
गेली कित्येक वर्ष शिवणकाम करते आहे.
मुख्य काम जरी नाईटि/ मॅक्सी/ गाऊन शिवून देणं असलं तरी, ऑर्डर नुसार इतरही काही वस्तू तयार करून देते. अश्या वेगवेगळ्या वस्तू तयार करून दिल्यामुळे माझं शिवणकामा बाबतचंं ज्ञान वाढतं.

अलिकडेच, बोरीवली येथे रहाणाऱ्या आणि खाद्य पदार्थांच्या व्यवसायात असणाऱ्या Swara Sunil Chavan ह्यांना ही chef cap तयार करून दिली.
"Inspirive" हा त्यांचा ब्रॅण्ड आहे. त्या अनेक खाद्यपदार्थ ऑर्डर नुसार तयार करून देतात.
त्यांचे खाद्यपदार्थ जपान ला सुद्धा पोचले आहेत.

त्यांच्या व्यवसाया बद्दल खास सांगायचं तर, सुप्रसिद्ध उद्योगपती अंबानी ह्यांच्या कुटुंबातील बहुचर्चित लग्नात "Inspirive" कडून उकडीचे मोदक मागवले गेले होते.

स्वरा उकडीच्या मोदकाचे क्लास ही घेतात.

मी त्यांच्या कडून पोटली बिर्याणी, गुळ पापडी च्या वड्या व ख्रिसमस केक हे खाद्यपदार्थ मागवले होते जे अतिशय उत्तम होते.

मला ही संधी दिल्याबद्दल ब्रम्हांडाचे आभार.

Thank you
Thank you
Thank you



07/05/2026

नमस्कार...!!
गेली कित्येक वर्षे नाईटिज तयार करण्याच्या व्यवसायात आहे.

सगळ्या प्रकारच्या वस्तू शिवता येत असल्याने नाईटिज व्यतिरिक्त ही काही वस्तू शिवून देते.
काही खास प्रसंगी भेट देण्यासाठी काही खास वस्तूंची आवश्यकता असते,ज्या बाजारात विकत मिळत नाहीत.

आजच्या videoत अश्याच एका खास वस्तू चा उल्लेख केला आहे. एका खास प्रसंगी भेट देण्यासाठी किचन एप्रन व शेफ कॅप तयार करून दिलीय , त्यावर मी lettering केलंय.
साधारण आठवी/ नववीत मी चित्रकलेच्या परिक्षा दिल्या होत्या तेव्हा शिकले होते.
त्याचा मला अनेकदा शिवणकामात उपयोग झाला आहे.

मला असं वाटतं ेट_वस्तू तयार करून देणं,हा माझ्या व्यवसायाचा USP ( व्यवसाया बाबतीतला खास मुद्दा)आहे.

बाजारपेठेतून पुर्ण न होऊ शकणाऱ्या नेमक्या गरजा शोधून, त्या पुर्ण करण्यासाठी योग्य कौशल्य शिकून घ्यावी लागतात.
त्याचा सराव करून त्यात प्राविण्य मिळवावं लागतं.
आणि हे सतत करावं लागतं.

मला अनेक कौशल्ये बहाल केल्या बद्दल ब्रम्हांडाचे ( universe) चे मनापासून आभार...!!

Thank you.
Thank you.
Thank you.



17/02/2026

नमस्कार...!!

आज कापडाबद्धल थोडी माहिती देतेय..
होलसेल कापड बाजारात , नाईटिज साठी खास ३ मिटरचे पीस मिळतात.
प्रत्येक प्रिंटचे सहा, आठ किंवा दहा रंग , असा एक संच असतो. होलसेल किंमतीचा लाभ मिळण्या साठी ग्राहकाला....म्हणजे मला असे संच विकत घ्यावे लागतात.

दुकानात पीस तपासून घेता येत नाहीत .
म्हणून प्रत्यक्ष काम करतांना प्रत्येक पीस संपूर्ण उघडून तपासून घ्यावा लागतो. कारण कधी काही पीस डिफेक्टीव असतात. असे पीस दुकानदार परत घेत नाहीत. मग त्यांचा वेगळ्या पद्धतीने वापर करावा लागतो...
त्या बद्दल पुन्हा कधीतरी लिहीन...

तर, ३ मिटर कापडातून एक नाईटि तयार होते. त्यामुळे त्यात खुप वेगळे असे पॅटर्न/ डिझाइन तयार करता येत नाहीत. पॅटर्न/ डिझाइन तयार करण्यासाठी जास्तीचं कापड किंवा लेस वगैरे वापरायचं असेल तर किंमत वाढते.
बरं, वेगळं कापड वापरलं तर रंग जाण्याची व मुख्य कापडावर तो रंग पसरण्याची शक्यता असते. म्हणून मी ते करण्याचं टाळते.

आजच्या videoत ३ नाईटिज पहायला मिळतील.

Thank you
Thank you
Thank you

14/02/2026

नमस्कार..
आजच्या videoत तुम्ही ३ नाईटिज पहाल. ह्या तीनही नाईटिज बाटिक कापडापासून तयार केल्या आहेत. नाईटिज बनवण्यासाठी ३ मिटर पीस बाजारात मिळतात. एकाच प्रिंट मध्ये सहा, आठ, दहा रंगाचा एक पीस अश्या संचात ते घ्यावे लागतात. (wholesale market).

बाटिक कापड सुती असल्याने मुंबईतील हवामानासाठी आरामदायी ठरतं. हे कापड टिकाऊ असतं. ह्या कापडाचे रंग टिकून रहावे म्हणून हे नाईटिज नेहमी उलट करून ( आतली बाजू बाहेर) सावलीत सुकवावेत.

आभार...!!

09/02/2026

नमस्कार...!!
गेली कित्येक वर्षे नाईटिज तयार करण्याच्या व्यवसायात आहे.
काही ग्राहकांच्या काही खास गरजा असतात ज्या बाजारात मिळणाऱ्या नाईटिज मध्ये पूर्ण होत नाहीत.
आजच्या videoत मी ह्याचाच खास उल्लेख केला आहे.

मला असं वाटतं हा माझ्या व्यवसायाचा USP ( व्यवसाया बाबतीतला खास मुद्दा)आहे.

बाजारपेठेतून पुर्ण न होऊ शकणाऱ्या नेमक्या गरजा शोधून, त्या पुर्ण करण्यासाठी योग्य कौशल्य शिकून घ्यावी लागतात.
त्याचा सराव करून त्यात प्राविण्य मिळवावं लागतं.
आणि हे सतत करावं लागतं.
मी हे करू शकतेय ह्यासाठी ब्रम्हांडाचे ( universe) चे मनापासून आभार...!!

Thank you.

05/02/2026

नमस्कार..!!
खरंच सध्याचा काळ हा नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सुवर्ण काळ आहे. आंतरजालावर असंख्य विषयांबद्धल भरपूर माहिती अक्षरशः फुकट उपलब्ध आहे. ह्या माहिती चं ज्ञानात रुपांतर तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्या माहितीचा उपयोग आपण प्रत्यक्षात करतो.
म्हणजे knowing आणि doing ...

माहिती चा प्रत्यक्ष उपयोग करण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो कसा करावा?
एखादी गोष्ट/ संकल्पना शिकून कशी घ्यावी?हे एकदा कळलं तर आपल्या साठी उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर आपण आपल्या प्रगती साठी करू शकतो.

आज एक video शेअर केलाय...
त्यात , मी "तुनळी" (म्हणजे आपलं युट्यूब!) वरून शिकत असलेल्या quilting म्हणजे तुकडे जोडून गोधडी तयार करणं,ह्याचा संदर्भ आहे.

मी उरलेल्या कापडातून दुपटी तयार करते. त्यांची सतत मागणी सुरू असते. पण ते वेळखाऊ काम आहे. ते सोपं व्हावं ह्यासाठी मी ह्या विषयावरचा, वैशाली पेशवे ह्यांचा ऑनलाईन कोर्स केला. त्यामुळे मुळ संकल्पना शिकता आल्या , विषयाबाबत स्पष्टता आली.
Thank you Vaishali Peshave

आता आणखी नवीन संकल्पना शिकण्यासाठी व दुपटी तयार करण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी मी युट्यूब ची मदत घेते आहे.
पण फक्त video पाहणं पुरेसे नसते , त्याचा अभ्यास करावा लागतो. तसेच भरपूर प्रमाणात सराव करावा लागतो. तेव्हाच योग्य वेळी त्या माहितीचा वापर करून पटकन दुपटी तयार करता येतात.
आता हे काम अंगवळणी पडले आहे. अर्थात त्यासाठी वही आणि पेन, पेन्सिल, पट्टी व,, रंगीत पेन्सिली ह्या सगळ्या साहित्याचा खूप उपयोग होतो आहे. आणि हा अभ्यास सतत सुरू रहाणार आहे.

Thank you
Thank you
Thank you

#पारंपारीक_दुपटी



#शिवणकला_खरी_गंमत_खरा_आनंद

नमस्कार...!!आज एक गोष्ट, एका ध्येय वेड्या माणसाची.."Tailor Bro" ची...!!!तामिळनाडू तील विरुधनगर येथे  सेल्वकुमार रहातात ....
01/02/2026

नमस्कार...!!

आज एक गोष्ट, एका ध्येय वेड्या माणसाची..
"Tailor Bro" ची...!!!

तामिळनाडू तील विरुधनगर येथे सेल्वकुमार रहातात .आई, पत्नी, लहान भाऊ आणि लहान बहीण असं त्यांचं कुटुंब आहे.
सेल्वकुमार खूप लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आईने शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.
सेल्वकुमार लहानपणापासूनच आईला शिवणकामात मदत करू लागले.
साधारण सोळा वर्षांचे असल्या पासून त्यांनी स्वतंत्र पणे शिवणकाम करायला सुरुवात केली. त्यांच्या कमाईतून त्यांनी भावाला इंजिनीअरींग चे शिक्षण दिले तर बहिणीला बारावी पर्यंत शिक्षण दिले.
नंतर त्यांनी बहिणिचं लग्न करून दिले.काही वर्षे बहिणीचा संसार सुरळीत सुरू होता . काही काळानंतर तिच्या नवऱ्याला दारू चे व्यसन लागले त्यामुळे तीची आर्थिक स्थिती खालावली. त्याचा परिणाम म्हणून निराश होऊन त्यांच्या बहिणीने आत्महत्या केली.
पण त्यापुर्वी तिने सेल्वकुमार ह्यांच्या नावे एक पत्र लिहिले होते,त्यात तिने लिहिले होते की तीला जर शिवणकाम आलं आहे असतं तर कदाचित जिवंत राहिली असती...
खरं तर त्यांच्या बहिणीला शिवणकाम शिकायचं होतं पण सेल्वकुमार ह्यांनी बहिणीला शिवणकाम शिकू दिलं नव्हतं कारण त्यांना वाटत होतं की बहिणीने सुखाने संसार करावा व सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या. आपल्या बहिणीला शिवणकामा पासून दूर ठेवून आपण आपल्या बहिणिचं नुकसान केलं अशी खंत सेल्वकुमार ह्यांना वाटू लागली.
आपल्या बहिणीवर जी वेळ आली ती इतर स्त्रियांवर येऊ नये ह्यासाठी सेल्वकुमार स्त्रियांना शिवणकाम शिकवू लागले आणि नंतर तेच त्यांचं ध्येय बनले. ह्या ध्येयाकडे एक व्रत म्हणून पहाणाऱ्या सेल्वकुमार ह्यांनी गेल्या कित्येक वर्षात एकही सण साजरा केलेला नाही.

आतापर्यंत सेल्वकुमार यांनी लाखो स्त्रियांना शिवणकामाचं प्रशिक्षण दिलं आहे.हे प्रशिक्षण सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत व आठवड्यातून सहा दिवस दिलं जातं.
विद्यार्थ्यांनीसाठी चहा , जेवण व वैयक्तिक मार्गदर्शन ह्याची सोय ते स्वखर्चाने करतात.
याशिवाय सेल्वकुमार डिजिटल माध्यमातूनही देशातील हजारो स्त्रियांना शिवणकामाचे प्रशिक्षण देत आहेत. डिजिटल माध्यमात सेल्वकुमार "Tailor Bro" नावाने सुप्रसिद्ध आहेत.
सेल्वकुमार ह्यांच्या बहिणी वर जी वेळ आली ती इतर कोणावरही येऊ नये, स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे ह्या उद्देशाने ते फक्त एक रुपयात हे प्रशिक्षण देतात.
एक कोटी स्त्रियांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
सेल्वकुमार बालपणापासून शिवणकाम करत आहेत त्यामुळे त्यांना उत्तम कौशल्य प्राप्त झाले आहे आहे आणि आपल्या ह्या कौशल्याचा वापर ते स्त्रीयांना शिवणकामाचे प्रशिक्षण देताना करतात.
एवढेच नव्हे तर ज्यांना शक्य नाही त्यांना स्वखर्चाने शिवणयंत्र खरेदी करून देतात. त्यांनी आतापर्यंत ५७ दुकाने सुरू करुन दिली आहेत. त्यांच्या कडून प्रशिक्षण घेऊन ४२ हजार स्त्रियांनी आहे स्वतःचे दुकान सुरू केले आहे.

असं म्हणतात, ईश्वराने प्रत्येक व्यक्तीला एक तरी कलागुण दिलेला असतो. शालेय/ कॉलेज शिक्षण व इतर कर्तव्य पार पाडताना आपण आपल्याला मिळालेल्या ह्या सुप्त गुणाकडे दुर्लक्ष केलेलं असतं. जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात जाते तेव्हा अशा काही गुणांमुळे आपण आयुष्याची वाटचाल सुरू ठेवू शकतो.

इंग्रजीत एक म्हण आहे...
"Your skills will pay your bills"

माझ्या मते सध्या चा काळ हा , कौशल्यवान व्यक्ती बनण्यासाठी, कौशल्य विकास करण्यासाठी सुवर्ण काळ आहे...!!

( मजकूर माहिती ...सौजन्य: दैनिक प्रत्यक्ष.)

Thank you
Thank you
Thank you





#शिवणकला_खरी_गंमत
#शिवणकला_खरा_आनंद

31/01/2026
30/01/2026

नमस्कार..!!
आजच्या videoत तुम्ही पाहाल अगदी तातडीने तयार करून दिलेल्या नाईटिज.
ह्या दोन्ही नाईटिज गळ्यापासून पायापर्यंत संपूर्ण उघडता येतात. आजारी स्त्रियांसाठी अश्या प्रकारच्या नाईटिजची आवश्यकता असते. माझ्या कामामुळे मी काही व्यक्तींना मदत करू शकते ह्यासाठी मी ब्रम्हांडाचे आभार मानते. Thank you, Thank you, Thank you

Address

Vishweshwar Road, Off Aarey Road, Goregaon East Mumbai , MAHARASHTRA
Bharat
400063

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 11am - 8am
Wednesday 11am - 8am
Thursday 11am - 8pm
Friday 11am - 8pm
Saturday 11am - 2pm
Sunday 11am - 1am

Telephone

+919819876934

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Stitchline All Types Of Nighties posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Stitchline All Types Of Nighties:

Share