20/02/2026
महाराष्ट्राची ओळख… पैठणी! ✨
ही फक्त साडी नाही, हा आहे परंपरेचा श्वास…
हातावर विणलेली संस्कृती…
आणि प्रत्येक धाग्यात जपलेली कहाणी.
रंग वेगळे केले जातात, रेशीम अलगद मोकळं केलं जातं,
एकेक बारीक धागा जोडला जातो…
केवढं कसून, किती संयमाने, किती प्रेमाने!
करघ्यावर बसलेला कारागीर
वेळ नाही, तर इतिहास विणत असतो…
डिझाईन नाही, तर वारसा घडवत असतो.
असं तयार होतं —
राजेशाही, नाजूक, आणि अभिमानानं मिरवलेलं नाव…
पैठणी.