ASHA- Andhalgaon Silk & Handloom Association

ASHA- Andhalgaon Silk & Handloom Association These sarees are handcrafted using tussar silk which is sourced from Vidharbha region. They are wove

18/11/2025

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जी विदर्भ करवती सिल्क साड़ी का प्रदर्शन करते हुए। यह साड़ी हमारे मित्र गोपी निनावे, आंधळगांव द्वारा निर्मित है।

कोसा शेती ती ही वाघाच्या भीतीच्या सावटा खाली...दिनांक  ३१.१०.२०२३, - स्थळ-मेंढकी. सर्वेक्षण टीम सोबत मी, संजीव भूरे, सचि...
18/11/2023

कोसा शेती ती ही वाघाच्या भीतीच्या सावटा खाली...

दिनांक ३१.१०.२०२३, - स्थळ-मेंढकी. सर्वेक्षण टीम सोबत मी, संजीव भूरे, सचिन मेश्राम व अन्य साथी सोबत चंद्रपुर जिल्हयतील ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंढकी या गांवात पोहोचलो. मच्छिमाराच्या वस्तीत पोहोचल्यावर मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष वसंत मारबते यांचे घरी बसून सर्वेक्षण सुरु केले. आजु बाजुचे सदस्य बोलावून त्यांच्या कुटुंबाची माहिती घेत असतांना एक महिला मध्ये प्रश्न विचारुन आम्हाला अड्थले करण्याचा प्रयत्न करीत होती. मी त्यांना म्हणालो "काय प्रश्न आहे तुमचा, सांगा आम्हाला?" ती म्हणाली "आम्ही इथे कोसा शेती करतो, शेती करतांना बराच खर्च होतो. कधी या शेतीतुन चांगले उत्पन्न मिळते तर कधी पाऊस झाला वा गारठा वाढला की नुकसान भोगावे लागते, कर्ज बाजारी व्हावे लागते मात्र अश्यावेळी शेतकऱ्यांना जशी पिकाची नुकसान भरपाई भेटते तशी सुविधा आमच्या साठी नाही. या बाबत तुम्ही कांही तरी करा". त्यावर मी म्हणालो "या शेती विषयी सविस्तरपणे सांगा. शेती कशी केली जाते व काय काय प्रश्न आहेत". तशी ती सांगू लागली.

कोसा शेती परंपरा ही जुन्या पीढीपासुन चालत आलेली आहे. वंशपरम्परेने चालत आलेले काम आहे व त्या अनुभवातुन मिळालेले हे दन्यान आहे. त्यासाठी जंगलातील १०० एकर जागेत येनाचे झाड़ व आजनाचे झाड़ झाड़े लावलेली आहेत. त्यांची ऊंची ६-८ फुट इतकी असते. ते झाड़ मोठे होते परंतु त्याला मोठे होवू देत नाही. त्याच्या वाढनाऱ्या फांदया कापल्या जातात व जमीनीपासुन हात पुरेल एवढी झाडांची ऊंची ठेवली जाते. त्यासाठी रेशीमची अंडी (कोसाचे बीज) हे भंडारा व गोंदिया जिल्हा, रांची (झारखंड), चिन्नूर (आंध्र प्रदेश) इत्यादी ठिकानाहुन विकत आणली जातात. एक हजार अंडी ही पाच हजार रूपयाची होतात. सच्छीद्र कापड़ी पिशवीत भरून ऑक्टो मध्ये ही अंडी विकत आणली जातात. कोसाच्या अंडी ह्या घरात हवेशीर वातावरणात ठेवली जातात. अंडी फुटून त्यातून कोसाच्या अळी बाहेर आल्यावर त्यांना जंगलात नेवून आजनाच्या झाडाच्या पानावर ठेवल्या जाते. आशाबाई सांगू लागल्या की "ईथूनच आमची कसरत सुरु होते. आमच्या गांवापासुन पांच किलोमीटर अंतरावर जंगलात आजनाची झाड़े आहेत. झाडाच्या पानावर रेशीम अळी ठेवली कि तीला जपावे लागते. एका झाडावर पन्नास अळी ठेवली जातात. आम्ही सगळी लोक पहाटे पाच वाजता शेतात पोहोचतो. कारण पक्षी सकाळी जागे झाल्यावर चारा शोधणयासाठी बाहेर पडतात. त्यांनी झाडावर बसु नये व झाडाच्या पानावर ठेवलेल्या रेशिम अळया टीपू नये, यासाठी ढोल वा टिनाचे पीपे वाजवून पक्ष्यान्ना हाकलले जाते. संध्याकाळी पक्षी आपल्या घरटयात जात नाही तोपर्यंत पीपे वाजवून पक्षांना हाकलत राहावे लागते. पक्षी त्यांच्या घरटयात परत गेल्यावर घराकड़े यावे लागते. जंगलात सतत वाघानची दहशत असते. रात्री बे रात्री शेताची राखण करावी लागते, जीवाची सुरक्षा नाही. आम्ही जीवावर उदार होवून हे काम करतो".
रेशीम अळी पानावर ठेवल्यावर ती चार दिवसांनी कोसा काढ़ते. व चार दिवस पाने खातों. पुन्हा कोस काढतो व पुन्हा चार दिवस चरतो. ही प्रक्रिया तीन वेळा होते. हा संपूर्ण कालावधी बाविस दिवसाचा असतो. नंतर कोसा बांधणयाची प्रक्रिया सुरु होते. झाडाच्या फांदीला फुंद करतो. दोन पानांना जुडवून कोसा बांधतो. कोसा बनवायला तीन महिने अवधी लागतो. एका झाडावर ४०-५० कोसा मिळतात. एकंदर ४००० कोसा (१ खंडी) ची किंमती रु १०,०००/- असते. घरातील तीन व्यक्ती सतत या कामासाठी गुतुंन असतात. प्रत्येक कोसा उत्पादकाला ५ एकर जागा दिली जाते. एका एकर जागेत एकूण १०० झाड़े लावली जातात. अश्या प्रकारे पाच एकरात पाचशे झाड़े लावून पन्नास हजार रुपये उत्पन्न होते. या गांवातील एकूण ८० कुटुंबाना कोसा उत्पादक म्हणून मान्यता आहे. या गांवाचे कोसा उत्पादक श्री लवादास मरबते म्हणतात की " मध्येच पाऊस आला वा गारठा पडला तर माल मरतो, नुकसान होते. नुकसान झाल्यास कोसा उत्पादक कर्ज बाजारी होतो. कोसा उत्पादक म्हणून सरकार कड़े नोंद असली तरी शेतकऱ्यासारखी नुकसान भरपाई मिळत नाही. दोन पिढ्या पासून कोसाची शेती करीत असून ही सरकारने जमीनीचे पट्टे दिलेली नाहीत. ब्रम्हपुरी तालुक्यातील आवलगांव, तुलनमेंढा, वायगांव, पदमापुर, आक्षापूर, बांदा, कोसंबी, खळसमारा, हळदा, भुज, मुरमाड इत्यादी ठिकाणी कोसा शेती होत असून अन्य तालुक्यातही होते, परंतु त्यांचे पट्टे अजूनही मिळाले नाहित. पावसापासुन सुरक्षा व्हावी म्हणून पालीची सुविधा, झाडावर चढन्यासाठी शिडीची गरज आहे, ती सरकार द्वारा पुरविन्यात यावी. तसेच सरकारी भाव हा कमी असतो जेव्हा खुल्या बाजारात ह्याच मालाची किंमत दुप्पट असते, याचा सरकार ने विचार करावा". कोसा निर्मितीसाठी सरकार तर्फे एक कर्मचारी नियुक्त केलेला आहे. तो कोसा बीज व औषधीचा पुरवठा करतो. क्रमशः ...

साभार श्री दीनानाथ वाघमारे, संघटक, संघर्ष वाहिनी, मो.९३७०७७२७५२

New arrival... Vidarbha karvati tassar saree  Jala pallu with Thikari design.
20/02/2023

New arrival... Vidarbha karvati tassar saree Jala pallu with Thikari design.

Vidarbh karavati jala pallu saree
08/09/2022

Vidarbh karavati jala pallu saree

NEW VIDARBHA KARAVATI SAREE, Pure tasar with jala pallu.... Very rare these days.💞
04/05/2022

NEW VIDARBHA KARAVATI SAREE, Pure tasar with jala pallu.... Very rare these days.💞

@7500/-Call ISHA - 9970191929
02/05/2022

@7500/-
Call ISHA - 9970191929

04/04/2022
31/03/2022

भंडारा येथील प्रसिद्ध कोसा रेशीम (Tusshar Silk ):- ऐतिहासिक काळापासून भंडारा हे उत्कृष्ट हातमाग फॅब्रिक विणण्यासाठी प्रसिद्ध होता आणि त्यात ही कोसा रेशीम चे कापड, साडी, चोळीचे कापड आणि रेशीम कडा व नक्षी असलेले सूती उपरने अधिकच लोकप्रिय होते. १८ व्या शतकात चांदा (चंद्रपूर) येथील गोंड राजाच्या काळात ,पौनी येथे कोसा रेशीम च्या इतिहासाचा धागा सापडतो , त्यानंतर लॉरेन्स यांच्या १८९७ मधील settlement report मध्ये . सन १८९१ च्या दरम्यान भंडारा येथे सर्वात लोकप्रिय उत्पादन म्हणजे तसर रेशीम कापड, रेशमी काठाचे कॉटन फॅब्रिक्स, बेनी कार्पेट व बेडशीट इत्यादी जे बहुतेक कोष्टी व इतर समाज विणत असे. त्यावेळी भंडारा जिल्ह्यात सुमारे 80000 विणकर होते, जसजसे लोकांनी गिरणी चे कापड वापरणे सुरू केले तसतसे हातमाग उद्योगाचा ह्वास होत गेला . भंडारा, आंधळगाव - मोहाडी, पौनी आणि उमरेड येथील तसार रेशीम कला त्या वेळी खूप प्रसिद्ध होती त्याशिवाय गणेशपूर, मुंद्री-तुमसर, सिहोरा, एकोडी, बाम्पेवाडा, लाखांदूर हे ठिकाण साडी चोळीच्या कपड्यांसाठी, रेशीमी काठांच्या सूती उपरने आणि लुगडी यासाठी प्रसिद्ध होते. बराचश्या परदेशी प्रदर्षणी मधे सुध्दा भंडारा चे रेशमी कापड हे आकर्षणाचे विषय असत. श्रीमंत लोकांसाठी बारीक धागांचे कपडे विणण्यात कोष्टी खूप तज्ज्ञ होते. टसर रेशीम कोष याची लागवड अड्याल, पौनी इत्यादी जंगलात होत होती आणि आजही तुम्हाला ते पाहायला मिळतील. टसर रेशीम साडी व कापड पाहायला खूपच आकर्षक असते आणि जेवढे ते जुने होईल तेवढे अधिक आकर्षक होत जाते असे म्हणतात. असे म्हटले जाते की भगवान रामांनी सीताला टसर रेशीम साडी भेट दिली होती. प्राचीन काळात रेशीम वस्त्र परिधान करणे म्हणजे श्रीमंती आणि उच्च विचाराचे द्योतक होते !!
Famous Tussar Silk at Bhandara :- Since historical time Bhandara been famous for the excellent handloom fabric weaving and in that Tussar Silk cloth, Sari, Choli cloth and cotton uparna with silk border were very much more popular. First historical trace of Tussar silk finds at Pauni during Chanda Kings in 18th century and 2nd at Bhandara at settlement report by Lawrence(1867). During 1891 most popular product at Bhandara were Tussar silk cloth , Cotton fabrics with silk border,Beni carpet , bedding sheets which were mostly weaved by Koshti and some other communities. During 1891 around 80000 weavers were there in Bhandara District ,people started using mill cloth and handloom industry declined .Tussar silk art at Bhandara, Andhalgaon „Mohadi,Pauni and Umred were very famous at that tir Ganeshpur, Mundri „Tumsar,Sihora ,Ekodi, Bampewada, Lakhandur were famous for Sari choli cloth, cotton uparna with silk border, and Lugadi. Silk cloth was a point of attraction in many foreign exhibit too. Koshtis were very expert in weaving fine threads for rich people. Cucoon for Tussar silk were cultivated in the forest of Adyal, Pauni etc and still you can find these plants in the forest here. Tussar Silk sari /cloth is very attractive and it is said that its shining rises as it get older. It is said that Lord Rama had gifted Sita with Tussar silk Sari. In ancient time wearing Tussar silk clothes was the indication of richness in wealth and thought also.

New & fresh....   karavati tassar saree.
29/03/2022

New & fresh.... karavati tassar saree.

Vidarbh karvati saree @₹8000/-
26/03/2022

Vidarbh karvati saree @₹8000/-

23/03/2022
17/03/2022

Wish you all colours of Happiness....

Address

Andhalgaon
Bhandara
441904

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919970191929

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ASHA- Andhalgaon Silk & Handloom Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share