23/02/2022
Gan Gan Ganat Bote म्हणजे शेगावचे संत गजानन महाराज सतत गण गण गणात बोते ह्या मंत्राचा उल्लेख करायचे. एका शिष्याने त्यांना त्याचा अर्थ विचारला त्यावर महाराज म्हणाले, पहिला गण म्हणजे जीव थोडक्यात जीवात्मा, दुसरा ‘गण’ शब्द म्हणजे शिव थोडक्यात शिवात्मा, तिसरा शब्द ‘गणात’ म्हणजे ‘हृदयात’ आणि चौथा म्हणजेच शेवटचा शब्द ‘बोते’ म्हणजे पहा, बघा. आता सगळे एकत्रित करून अर्थ म्हणजे हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला, देवाला-परमेश्वराला बघ.