Roopshree

Roopshree Our hard work, dedication and perseverance have earned us the distinction of being voted the most preferred showroom in Parbhani from last 50 years.

Roopshree is the retailers of Sarees, Panjabi dress, Suiting, Shirting & much more having our retail showroom located at Shivaji Road, Parbhani having the largest collection of Sarees, Panjabi dress, Suiting, Shirting & Much more. Roopshree is the retailers of Sarees, Panjabi dress, Suiting, Shirting & much more having our retail showroom located at Shivaji Road, Parbhani having the largest collec

tion of Sarees, Panjabi dress, Suiting, Shirting which get the benefit of diverse varieties, exclusive designs and authentic brands.

14/01/2019
व्रतवैकल्यांचा श्रावण महिना सुरू झाला की आनंदोत्सवांची मालिका सुरू होते. यंदाचा श्रावण महिना सरला असून, आता घराघरात लाडक...
23/08/2017

व्रतवैकल्यांचा श्रावण महिना सुरू झाला की आनंदोत्सवांची मालिका सुरू होते. यंदाचा श्रावण महिना सरला असून, आता घराघरात लाडक्या गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदा गणेशोत्सव बारा दिवस असल्याने उत्सवात अधिक धमाल करण्याची संधी बच्चे कंपनीला मिळणार आहे. येत्या शुक्रवारी (२५ ऑगस्ट) श्री गणेशाचे आगमन होणार आहे. गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पहाटे ४.३० (ब्राह्ममुहूर्तापासून) वाजल्यापासून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे.
या वर्षी श्री गणेशोत्सव बारा दिवसांचा आहे. येत्या गुरुवारी (२४ ऑगस्ट) हरितालिका पूजन आहे. शुक्रवारी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनंतर भद्रा असली तरी, श्री गणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठा आणि पूजन करण्यास ती वर्ज्य नाही. त्यामुळे शुक्रवारी ब्राह्ममुहूर्तापासून दुपारी १.४५ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने कोणत्याही वेळी श्रीगणेश पूजन करता येईल, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
दशमीची वृद्धी झाल्याने यंदा गणेशोत्सव बारा दिवसांचा असून, पाच सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. त्या दिवशी मंगळवार असला तरी नेहमीप्रेमाणे गणेश विसर्जन करता येते. यापूर्वी २००८, २००९ आणि २०१०मध्ये सलग ती वर्षे गणेशोत्सव बारा दिवसांचा होता. आपल्या घरी जेवढे दिवस उत्सव तितके दिवस सकाळी पूजा आणि रात्री आरती, मंत्रपुष्पांजली म्हटल्याने केल्याने घरातील वातावरण प्रसन्न होते. घरातील मूर्ती सुमारे एक वीत म्हणजेच सात बाय आठ इंच उंचीची असावी. ही मूर्ती आसनस्थ आणि सुबक असावी तसेच ती मातीची अथवा शाडूचा असावी, असे आवाहन दाते यांनी केले आहे.

चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा गुढीपाडवा कॅलेंडरमध्ये २८ मार्चला (मंगळवार) दाखविण्यात येत असला तरी विविध पंचागक...
27/03/2017

चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा गुढीपाडवा कॅलेंडरमध्ये २८ मार्चला (मंगळवार) दाखविण्यात येत असला तरी विविध पंचागकर्त्यांमध्ये मतभेद आहेत. पण महाराष्ट्रातील नागरिकांनी येत्या २८ मार्च रोजी सूर्योदयानंतर सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी गुढी उभारावी, असे आवाहन दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.

येत्या २८ मार्चला सूर्योदयानंतर ८ वाजून २७ मिनिटांपर्यंत अमावस्या असून प्रतिपदेची समाप्ती २९ मार्चला सूर्योदयापूर्वी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी होते आहे. त्यामुळे २८ मार्च याच दिवशी अमावस्या समाप्तीनंतर नेहमीप्रमाणे गुढी उभारून पूजा करावी. देशात सूर्यसिद्धांत आणि दृकसूक्ष्म गणितपद्धती अशा दोन पद्धतींची पंचागे आहेत. गणित पद्धतीच्या भिन्नतेमुळे काही सण वेगवेगळ्या दिवशी येतात. संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, चंदिगड, हरियाना, उत्तर प्रदेश, कर्नाटकातील बऱ्याचशा भागात पंचागामध्ये आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचागातही सूक्ष्म गणित पद्धतीनुसार २८ मार्च रोजी गुढीपाडवा दिलेला आहे. या पूर्वी २८ मार्च १९९८, १९ मार्च २००७ आणि ६ एप्रिल २००८ या वर्षी देखील अमावस्या समाप्तीनंतर गुढीपाडवा आला होता. यानंतर १९ मार्च २०२६ मध्ये पुन्हा अशाच प्रकारे सकाळी अमावस्या समाप्तीनंतर गुढीपाडवा येईल, असे दाते यांनी सांगितले.

याबद्दल शारदा ज्ञानपीठ्मचे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, येत्या २८ मार्चला फाल्गुन अमावस्या सकाळी ८ वाजून २७ पर्यंत आहे. नागरिकांना ‘अमा-समाप्ती’ पूर्वी स्नान, देवपूजा करता येईल. मात्र सकाळी ८ वाजून २७ मिनिटानंतर पुनः अभ्यंगस्नान करून गुढीपूजन आणि पाडव्याची कृत्ये करावीत.

गणपती विसर्जन पाण्यामध्येच का करतात ?सर्व देव देवतांमध्ये गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणे...
15/09/2016

गणपती विसर्जन पाण्यामध्येच का करतात ?

सर्व देव देवतांमध्ये गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. गणेशोत्सवानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करतात. असे करण्यामागे काय कारण आहे हे समजून घेऊ या...

गणपती हा बुद्धीचा देव आहे. माणसाची बुद्धी कुशाग्र असेल तर कामात अडचणी येत नाहीत. अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करता येते. हे विश्व पाच महाभूतांनी मिळून बनले आहे. या पाच तत्त्वांपैकी एक तत्त्व आहे जल. जलाचा अधिपती आहे गणपती. माणसाच्या मेंदूचा अधिकांश भाग तरल आहे, असे विज्ञानानेही मान्य केले आहे. त्यामुळेच गणपतीला बुद्धीची देवता मानण्यात येते व गणपतीचे विसर्जन पाण्यात करतात. गणपतीचा निवास पाण्यात असतो, अशी मान्यता आहे.

मनुष्याची उत्पत्तीही जलापासूनच झाली आहे. भगवंताचा पहिला अवतार मत्स्य अवतार आहे. हा अवतार पाण्यात जन्मास आला. त्यामुळे मानवी संस्कृतीत जलाला पूज्य स्थान आहे. भगवान गणपती जल तत्त्वाची अधिपती देवता आहे. त्यामुळे गणपतीला प्रथम पूज्य मानण्यात येते. गणपती विसर्जन पाण्यात करण्यामागेही हेच कारण आहे.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ...... !!!!

"रूपश्री" शिवाजी रोड परभणी ४३१ ४०१

गणेश मन्दिर कालपी  यमुना नदीच्या काठावर असलेले उत्तर प्रदेश कालपी जिल्ह्यात हे गणेश मंदिर स्थित आहे. धार्मिक समजुती या प...
14/09/2016

गणेश मन्दिर कालपी

यमुना नदीच्या काठावर असलेले उत्तर प्रदेश कालपी जिल्ह्यात हे गणेश मंदिर स्थित आहे. धार्मिक समजुती या प्रसिद्ध मंदिर सुद्धा ऐतिहासिक कारणांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या मंदिरात तीन मुर्त्या आहेत . या तीन मुर्त्या दक्षिण मुखी आहेत, पण गणेशाची सोंड उत्तरेस आहे. या मंदिराची निगराणी गेल्या ६०० वर्षांन पासून महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंब करत आहे. शिवाजी महाराजांच्ये गुरु समर्थ रामदास या मंदिराची स्थापना केली होती असे म्हंटले जाते.

गणपती बाप्पा मोरया ...... !

"रूपश्री" शिवाजी रोड परभणी - ४३१ ४०१

सासवी कालू आणी कालू गणेश मंदीर, हंपी, कर्नाटक. सासवी कालू आणी कालू गणेश मंदीर हे हंपी चे हे आधीपासून असलेल्या विजयनगर रा...
13/09/2016

सासवी कालू आणी कालू गणेश मंदीर, हंपी, कर्नाटक.

सासवी कालू आणी कालू गणेश मंदीर हे हंपी चे हे आधीपासून असलेल्या विजयनगर राज्याचे सर्वात महत्वाचे आकर्षण आहे. या मंदिरा मध्ये गणेशाच्या २ मुर्त्या आहेत इ.स १४४० च्या ह्या मुर्त्या कर्नाटकातील सर्वात मोठ्या गणेश मुर्त्या आहेत असं म्हंटलं जात.

या मूर्तींच्या पोटात गुप्तधन आहे असा समज डेक्कन सुलतान (अफगाण) ह्यांना कळाले म्हणून त्यांनी मूर्ती चे पोट तोडण्याचा प्रयत्न केला म्हणून १का मूर्तीच्या पोटाला तडा गेलेला आहे.

गणपती बाप्पा मोरया ......!

"रूपश्री" शिवाजी रोड परभणी - ४३१ ४०१

करपागा विनायक मंदीर, पिलियारपट्टी, तामिळनाडू. हे जुने आणि १६०० वर्ष जुने मंदिर "राजा पंड्या" यांनी बांधले होते. येथील सह...
12/09/2016

करपागा विनायक मंदीर, पिलियारपट्टी, तामिळनाडू.

हे जुने आणि १६०० वर्ष जुने मंदिर "राजा पंड्या" यांनी बांधले होते. येथील सहा फुटाची येथील रेखीव आणि कोरीव एका दगडातील येथील गणेश मूर्ती आणि त्याच्या अंगावरील तेवढ्याच सुबकतेने रेखलेले दागिने पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. हि इथे येण्याऱ्या पर्यटकांचा आवडती जागा आहे.

दर वर्षी गणेश चतुर्थी ला लाखो भाविक इथे जमतात आणि गणेशाची पूजा-अर्चा करतात.

गणपती बाप्पा मोरया ....... !

"रूपश्री" शिवाजी रोड परभणी - ४३१ ४०१

गणेश टोक मंदिर, गंगटोक , सिक्कीम.  खूप कमी लोकांना माहिती असलेले हे आणि बुद्दीष्ठ भूमी वर प्रसिद्ध असे हे एकमेव गणेश मंद...
11/09/2016

गणेश टोक मंदिर, गंगटोक , सिक्कीम.

खूप कमी लोकांना माहिती असलेले हे आणि बुद्दीष्ठ भूमी वर प्रसिद्ध असे हे एकमेव गणेश मंदिर आहे. या मंदिराचे सर्वात जास्त महत्व हे त्याच्या उंची मुळे आहे ६५०० फूट उंच अश्या टेकडीवर हे मंदिर आहे आणि मंदिराच्या भोवतालीचा परिसरा मुळे या मंदिराला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. मंदिराच्या जवळ असलेले लश ग्रिन वॅली आणि कांचनगंगा पर्वत रांगेच दर्शन होतं.

गणपती बाप्पा मोरया .... !

"रूपश्री" शिवाजी रोड परभणी - ४३१ ४०१

10/09/2016

उची पिलियार कोईल गणेश मंदिर, तामिळनाडू

हे भव्य मंदिर तिरुचिलापीली च्या एका टेकडीवर तामिळनाडूमध्ये वसलेले आहे. या मंदिरामागे खूप मोठी कथा आहे.

असं म्हंटलं जात कि रावणाला मारून जेव्हा दशरथ रामाने बिभीषणाला रंगनाथाची मूर्ती भेट दिली आणि सांगितले कि जिथे हि मूर्ती ठेवशील तिथेच या मूर्ती ची स्थापना होईल. बिभीषण हा रावणाचा भाऊ असल्या कारणाने बऱ्याच देवांना असे वाटत होते कि ती मूर्ती लंके मध्ये जाऊ नये. तदेवांनी गणेशाला हि गोष्ट सांगितली. कावेरी नदीच्या पात्रात जेव्हा बिभीषण रंगनाथाची मूर्ती घेऊन स्नान करत होता, गणेशाने छोट्या मुलाचे रूप घेऊन त्याच्या समोर आला आणि म्हणाला कि स्नान होई पर्यंत मी हि मूर्ती धरतो आणि ती मूर्ती जवळच एका दगडावर ठेऊन पळाला. बिभीषणाला राग आला आणि त्याने पाठलाग केला असता त्याला गणेशाने आपल्या अवतारात दर्शन दिले. म्हणून ह्या मंदिरात रंगनाथाचे हि मंदिर आहे पण जास्त भाविक हे गणेशच्या दर्शनासाठी येतात.

गणपती बाप्पा मोरया .... !

उची पिलियार कोईल गणेश मंदिर, तामिळनाडू हे भव्य मंदिर तिरुचिलापीली च्या एका टेकडीवर तामिळनाडूमध्ये वसलेले आहे. या मंदिराम...
10/09/2016

उची पिलियार कोईल गणेश मंदिर, तामिळनाडू

हे भव्य मंदिर तिरुचिलापीली च्या एका टेकडीवर तामिळनाडूमध्ये वसलेले आहे. या मंदिरामागे खूप मोठी कथा आहे.

असं म्हंटलं जात कि रावणाला मारून जेव्हा दशरथ रामाने बिभीषणाला रंगनाथाची मूर्ती भेट दिली आणि सांगितले कि जिथे हि मूर्ती ठेवशील तिथेच या मूर्ती ची स्थापना होईल. बिभीषण हा रावणाचा भाऊ असल्या कारणाने बऱ्याच देवांना असे वाटत होते कि ती मूर्ती लंके मध्ये जाऊ नये. तदेवांनी गणेशाला हि गोष्ट सांगितली. कावेरी नदीच्या पात्रात जेव्हा बिभीषण रंगनाथाची मूर्ती घेऊन स्नान करत होता, गणेशाने छोट्या मुलाचे रूप घेऊन त्याच्या समोर आला आणि म्हणाला कि स्नान होई पर्यंत मी हि मूर्ती धरतो आणि ती मूर्ती जवळच एका दगडावर ठेऊन पळाला. बिभीषणाला राग आला आणि त्याने पाठलाग केला असता त्याला गणेशाने आपल्या अवतारात दर्शन दिले. म्हणून ह्या मंदिरात रंगनाथाचे हि मंदिर आहे पण जास्त भाविक हे गणेशच्या दर्शनासाठी येतात.

गणपती बाप्पा मोरया .... !

Address

Shivaji Road
Parbhani
431401

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

02452222524

Alerts

Be the first to know and let us send you an email when Roopshree posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Roopshree:

Share