03/08/2023
राजा शिवछत्रपती ही अजरामर मालिका बनवणारे निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली....!
त्यांनी लगान , हम दिल दे चुके सनम , देवदास , फर्जंद , डॉ बाबासाहेब आंबेडकर , लगे रहो मुन्नाभाई , 1941 : अ लव्ह स्टोरी , मुन्नाभाई एमबीबीएस , वनस अपोन अ टाईम इन मुंबई अशा अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन सुध्दा केले होते!
त्यांच्या अशा अकाली जाण्याने महाराष्ट्राचे, मराठी बाण्याचे कधीही भरून न येणारे असे अभूतपूर्व नुकसान झालेले आहे! एवढा दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा माणूस असे पाऊल उचलू शकतो ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही....
राजा शिवछत्रपती ही मालिका जेव्हा आली तेव्हा मालिका सुरू होण्याआधी येणारे शीर्षक गीत मोठा आवाज करून न ऐकणारे अन् नितीन चंद्रकांत देसाई कृत राजा शिवछत्रपती हे ग्राफिक्स बघून रोमांचित होणारे क्वचितच एखादे घर असेल महाराष्ट्रात! ते शीर्षक गीतच आपल्याला शिवकाळात घेऊन जायचे!
राजा शिवछत्रपती आमच्या समोर मांडणाऱ्या ह्या मावळ्यास
भावपूर्ण श्रद्धांजली💐
Nitin Chandrakant Desai