02/10/2026
महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीसह भारतीय चित्रपट आणि दृक्-श्राव्य क्षेत्राला गेली पाच दशके भक्कम पायाभूत सुविधा आणि निर्मितीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ऑरेंजटीप डिझाईन्सतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाची कलाकृती साकारण्यात आली आहे. या बोधचिन्हाचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
#दादासाहेबफाळकेचित्रनगरी #सुवर्णमहोत्सव #मराठीचित्रपटसृष्टी