Abhay tambe

Abhay tambe proud to be indian

27/11/2024

कोण आहे धाराशिवच्या पालकमंत्री पदी योग्य
आपले मत कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा.
मागील काही वर्षांमध्ये खुंटलेला धाराशीव चा विकास खालीलपैकी कोणता नेता मंत्री वर आणू शकतो.

Ranajagjitsinha Patil Tanaji Sawant - तानाजी सावंत

05/10/2024
02/10/2024
27/09/2024
27/09/2024

तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या रू.१,९९९ कोटी रकमेच्या अंतिम विकास आराखडा मान्यतेसाठी सादर!

भाविक भक्त, पुजारी व शहरवासीयांना विश्वासात घेत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणारा, तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या वैभवात भर टाकणारा परिपूर्ण असा विकास आराखडा अंतिम करण्यात आला आहे.

पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या मान्यतेसह या प्रस्तावास पुढील १० दिवसांत मंजुरी मिळेल असा विश्वास आहे.

आई तुळजाभवानीचे तिर्थक्षेत्र विकसित करण्यासाठी प्राथमिक विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या विकास आराखड्यास १६ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली होती.

तद्नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आयडिया कॉम्पटिशन घेण्यात आली होती. निश्चित केलेल्या वास्तु विशारद कंपनीने आराखड्याचे सादरीकरण केल्यानंतर सदरील आराखडा मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना व हरकती मागवून घेण्यात आल्या.

दि.२० जुलै रोजी आपण शहरवासीयांसमवेत बैठक घेतली. त्यातून आलेल्या सूचनांवर निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली. पुजारी, भाविक व शहरवासीयांच्या सूचनांचा अभ्यास करुन योग्य आक्षेप व सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला व दि.२८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांनी अंतिम आराखड्याचे सादरीकरण केले.

महाद्वाराजवळच दर्शन मंडळ निश्चित करण्यात आला असून प्रवेश मार्ग व बाहेर जाण्याचा मार्ग देखील महाद्वारातूनच ठेवण्यात आलेला आहे. आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे १०८ फूट उंचीच्या शिल्पाचे काम स्टेनलेस स्टील व ब्राँझ मध्ये सुप्रसिध्द वास्तु विशारद श्री‌.राम सुतार यांच्याकडून करुन घेण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

या आराखड्यामध्ये मुख्य दर्शन मंडप व तेथील अनुषंगिक सुविधा, घाटशीळ व हडको येथे भाविक सुविधा केंद्र, शहरात व शहराच्या प्रमुख रस्त्यावरील प्रवेशद्वारावर आकर्षक कमान, वृंदावन गार्डन सारखा बाग बगीचा, वृध्द व दिव्यांगाकरिता लिफ्ट, टॅ्व्हलेटर या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच विकास कामांसाठी आवश्यक भूसंपादनाकरिता देखील निधीची तरतूद ठेवण्यात आली आहे. साधारणत: भूसंपादन, कर व इतर बाबी वगळता, प्रत्यक्षात रु. १,१०० कोटींची कामे यामध्ये प्रस्तावित आहेत.

#तुळजापूर #विकास_आराखडा

26/09/2024
25/09/2024
25/09/2024

स्व.अण्णासाहेब पाटील यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांनी माथाडी कामगारांच्या तसेच मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आजीवन संघर्ष केला. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी आणि दिशादर्शक राहील.

#अण्णासाहेबपाटील #जयंती #अभिवादन

Address

Tuljapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhay tambe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share